धक्कादायक! लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाची आत्महत्या
Updated On:

बीड – लग्नानंतर दोन दिवसांनीच नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे घडली आहे. पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नावआहे. लग्नानंतर सत्यनारायणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवार (20 नोव्हेंबर) रोजी पांडुरंग याचा माजलगाव येथे थाटामाटत विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी सत्यनारायण पूजा पार पडली. सर्व कुटुंबीय आणि नववधू घरातील कामात व्यस्त होते. त्याचेवळी अज्ञात कारणाने पांडुरंगने शेतात जावून झाडाला गळफास लावून अत्महत्या केली. पांडुरंगने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास माजलगाव पोलिस करत आहेत.





