नवी दिल्ली – म्यानमारमध्ये मे महिन्यात आलेल्या “मोचा’ वादळामुळे झाल्या नुकसानीचे वार्तंकन केल्याबद्दल एका वृत्तसंस्थेच्या पत्रकार-छायाचित्रकाराला 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. साई झॉ थाईके असे या मुक्त पत्रकाराचे नाव असून ते म्यानमार नाऊ या ऑनलाईन वृत्तसंस्थेसाठी वार्तांकन करत असतात. त्यांना रखाईन प्रांतातून 24 मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता.
म्यानमारमधील यान्गोन येथील इन्सेन तुरुंगातच हा खटला चालवला गेला. या कालावधीमध्ये साई यांना त्यांच्या कुटुंबियांनाही भेटू दिले गेले नाही, असे त्यांच्या वृत्तसंस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
“मोचा’वादळामुळे राखाईन राज्यात किमान 148 लोक ठार झाले, त्यातील अनेक छळ झालेल्या मुस्लिम रोहिंग्या अल्पसंख्याकांचे सदस्य अंतर्गत विस्थापन शिबिरांमध्ये राहत होते. याशिवाय वादळामुळे 1 लाख 86 हजाराहून अधिक इमारतींचे नुकसान झाले होते.
म्यानमारमध्ये लष्करी राजवट लागू झाल्यापासून तेथे प्रसिद्धी माध्यमांच्या कार्यावर मोठे निर्बंध आले आहेत. म्यानमार हे सध्या चीन खालोखाल पत्रकारांसाठी सर्वात मोठे जेलर बनले आहे, अससे “रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या मुक्त पत्रकारांच्या संघटनेने एप्रिल महिन्यात म्हटले होते. ‘