Mumbai news – पायधुनी परिसरात फूड पॉइझनिंगमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. बिर्याणीनंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. Mumbai news या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना मृत्यू झाला. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावे आहेत. Mumbai news कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडाचे आणि त्यांच्या शरिरातील नमुने घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण तपासण्यास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले. (Mumbai news) मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. पोलिसांच्या मते मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. Mumbai news Mumbai news : धक्कादायक.! बिर्याणीनंतर कलिंगड खावून कुटुंब संपले; चार जणांचा संशयास्पद मृत्यू या प्रकरणी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे म्हणाले, जे जे मार्ग पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुली अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai news) कुटुंबाने त्यांच्या इतर नातेवाईकांसह 25 एप्रिलच्या रात्री दहाच्या दरम्यान एकत्र जेवण केले होते. रात्री एक-दीडच्या सुमारास त्यांनी पुन्हा कलिंगड खाल्ले अशी माहिती आहे. त्यानंतर त्यांना उलट्या, जुलाबचा त्रास होऊ लागला असता, रुग्णालयात भरती केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.