प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – विरेंद्र चौधरी यांच्या पत्नीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. विरेंद्र चौधरी यांचे अंडाभुर्जीचे हॉटेल असून, ८ डिसेंबर रोजी रात्री जेवण करून ते हॉटेलवर गेले असताना त्यांची पत्नी प्रियाने आत्महत्या केली. पहाटे विरेंद्र हॉटेलवरून घरी आले असता त्यांनी पत्नीला आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विरेंद्र यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता, प्रिया यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. विरेंद्र यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत नागरिकांच्या मदतीने प्रिया यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रिया विरेंद्र चौधरी (वय २३, रा. शिक्रापूर, मूळ रा. हातगाव, जि. फतेपुर, उत्तरप्रदेश) यांना मृत घोषित केले.याबाबत विरेंद्र वैजनाथ चौधरी (वय २४, रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिसात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे करत आहेत.