धक्कादायक !!! रस्त्याच्या बांधकामाला विरोध केल्यामुळे दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न

Madhya Pradesh | मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील मनगावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या बांधकामाला विरोध केला म्हणून दोन महिलांना डंपरमधून खडी टाकून जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील हिनोता जरोत गावात रस्त्याचे बांधकाम सुरू होतं. मात्र, या रस्त्याच्या बांधकामाला गावातील दोन महिलांनी विरोध करत हा रस्ता आमच्या खासगी जागेवर बांधण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदाराने थेट महिलांच्या अंगावर मुरूम टाकत त्यांना ढिगाऱ्याखाली गाडण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं? Madhya Pradesh |
एका खासगी जमिनीवर रस्ता बनवण्याचा प्रयत्न सुरु होता. याच गोष्टीचा विरोध आशा पांडेय आणि ममता पांडेय या दोन महिलांनी केला होता. रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी डंपर आला तेव्हा या महिला डंपरच्या मागे उभ्या राहिल्या. त्याचवेळी डंपर चालकाने मुरुमाने भरलेली ट्रॉली या महिलांच्या अंगावर खाली केली. त्यामुळे दोन्ही महिला मुरुमाखाली गाडल्या गेल्या. त्यावेळी महिलांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी तातडीने खोऱ्याच्या मदतीने मुरुम बाजूला करुन महिलांना बाहेर काढले.
BJP का जंगलराज
मध्य प्रदेश के रीवा से मानवता को शर्मसार करता एक वीडियो सामने आया है।
यहां जमीनी विवाद के चलते दबंगों ने दो महिलाओं को जिंदा जमीन में गाड़ने की कोशिश की।
ये वीडियो BJP सरकार में लचर कानून व्यवस्था और महिला विरोधी सोच का एक और सबूत है।
इस घटना ने फिर साबित कर… pic.twitter.com/7rdbGRAM5d
— Congress (@INCIndia) July 21, 2024
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुरूम टाकण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक आणि बुलडोजरदेखील जप्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर काँग्रेसनेही मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसची भाजपवर टीका Madhya Pradesh |
मध्य प्रदेशच्या रीवामध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून काही गुंडांनी दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना म्हणजे मध्य प्रदेशच्या बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरावा आहे. महिला सुरक्षा आणि त्यांच्या सक्षमीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दावे पोकळ असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशात महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणेच मौन बाळगून आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा:





