Kolhapur News : धक्कादायक ! पुण्यानंतर आता कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार

कोल्हापूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर पडक्या शिवशाही बसमध्ये एका सराईत गुन्हेगाराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. ही घटना ताजी असताना आता कोल्हापूरमधूनदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीकडून बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपीचे नाव विश्वजीत सचिन जाधव असून तो कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने 2018 पासून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हंटले आहे. तसेच आरोपीने दोनवेळा इच्छेविरुध्द गर्भपात करायला लावल्याचेदेखील पीडितेने आपल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आरोपी गाडेवर एक लाख रुपयांचे बक्षीस
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात सरकारी बसमध्ये फलटणच्या तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांची अनेक पथके आरोपींच्या शोधात व्यस्त आहेत. दरम्यान, फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून बस स्थानकावर तैनात असलेल्या 23 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
स्वारगेट सारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी जर अशा घटना घडत असतील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.





