प्रभात वृत्तसेवा पुणे – कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे विवाहितेने फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी पती, सासू, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिशा निलेश शहा (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत हितश्री संदेश शहा (५७, रा. सोमजी हाईट्स, श्रद्धानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती निलेश शहा, सासू संगीता शहा, दीर प्रशांत शहा (तिघे रा. भूगाव) आणि नणंद ममता व्होरा (रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा हिचा निलेश दिलीप शहा (३०, रा. माऊंट ब्लेएर सोसायटी, भुगाव) याच्याबरोबर जैन समाजातील रुढी परंपरानुसार २० डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. निलेश शहा हा खासगी नोकरी करतो. त्याने लग्न झाल्यानंतर दिशा हिला नोकरी सोडायला लावली. विवाह झाल्यानंतर तिला सर्वजण त्रास देत होते. तू स्लो आहेस, तुला संसार जमत नाही. तसेच तुझे डोळे छोटे आहेत, असे बोलून तिला त्रास देत असत. दिशा हिला स्वयंपाक करायला लावायचे मात्र, तिने बनवलेले कोणीही खात नसे, अशा प्रकारे तिचा मानसिक छळ करीत होते.