वाईत चिमुकल्याचा शॉक लागून मृत्यू

वाई  – फरशी दुरुस्तीच्या कामावेळी सुरू असलेल्या फरशी कटिंग मशिनच्या वायरला हात लावल्याने सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना वाईतील फुलेनगर (चौडाफाटा) येथे घडली. सुरज चंद्रकांत पाटील असे मृत चिमुकल्याचे नाव असून सूरज हा सुट्टीसाठी आजोळी आला असताना ही घटना घडली आहे.

अधिक महिती अशी, वाई शहरातील सिद्धनाथवाडी येथील सूरज चंद्रकांत पाटील हा सहा वर्षाचा चिमुकला सुट्टीनिमित्त फुलेनगर (चौडाफाटा) येथे आजोळी आजीकडे आला होता. मंगळवारी सूरजच्या आजीच्या घरातील फरशीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी फरशी कटिंग करण्याच्या मशिनला असलेल्या वायरला सूरजने हात लावला. यावेळी विद्युतप्रवाह सुरु असल्याने सूरजला जोरदार शॉक लागला. या घटनेत सूरज जागीच निपचित पडला. त्यानंतर वडिलांनी त्वरित त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.