शोभिता धुलिपाल आणि नागा चैतन्यच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने ‘तो’ व्हिडीओ केला शेअर; कॅप्शनने वेधले लक्ष

Sobhita Dhulipala : अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या लग्नाला आज ४ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक तेलुगु रितीरिवाजानुसार या जोडप्याने लग्न केले. यानिमित्ताने शोभिताने सोशल मीडियावर लग्नातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
त्यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले असून शोभिता धुलिपालाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत लग्नातील अनेक सुंदर क्षण दिसत आहेत, ज्यात हळदी समारंभाचाही समावेश आहे. “मी ज्याला पती म्हणते त्याच्यासोबत सूर्याकडे जाण्याच्या एका रोमांचक प्रवासावर…”, असे शोभिताने व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
नागा चैतन्यने शोभितेने शेअर केलेल्या व्हिडीओवर, “तुझ्या प्रवासाचा भाग होण्याचा आनंद झाला, मी असे मानत नाही की एखादी व्यक्ती अपूर्ण असते आणि कोणीतरी ती पूर्ण करण्यासाठी येते. आपण स्वतःमध्ये पूर्ण आहोत.” अशी कमेंट केली आहे. चाहत्यांनीही दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्न करण्यापूर्वी शोभिता आणि नागा चैतन्य दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्रांनी हजेरी लावली होती. नागा चैतन्यचे पहिले लग्न २०१७ मध्ये अभिनेत्री समांथा रूथ प्रभूशी झाले होते. २०२२ मध्ये दोघांनीही आपल्या नात्याचा शेवट करत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ३ दिवसांपूर्वी, १ डिसेंबर २०२५ रोजी समांथाने ईशा फाउंडेशनमध्ये चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केले.





