शिवसेनेचे नेते अभय साळूंखे कॉंग्रेसमध्ये जाणार

लातूर – शिवसेनेचे लातूर जिल्हा सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या (मंगळवार, दि.2 एप्रिल) रोजी निलंग्यात एका कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. लातूर येथील कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी आ.अमित देशमुख,अशोक पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.

दोन्ही निलंगेकर एक असल्याचा गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप अशोक पाटील निलंगेकर यांनी केला. आणि अभय साळुंके यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचे स्वागत केले. अभय साळुंके यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रिया आ.अमित देशमुख यांनी व्यक्त केली.


लातूर लोकसभा मतदार संघ 2024 मध्ये खुल्या वर्षासाठी
लातूर लोकसभा मतदार संघ हा राखीव मतदार संघ निर्माण झाल्यानंतरची ही तिसरी आणि शेवटची निवडणूक होत आहे. नियमाप्रमाणे कुठलाही एक मतदार संघ पंधरा वर्षांपेक्षा अधिक राखीव ठेवता येत नाही.2024 च्या निवडणुकीत लातूर लोकसभा मतदार संघ सर्वांसाठी खुला होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.