“तुमच्या बुडाला तात्पुरतं मंत्रिपद जरूर चिकटलं असेल पण..”; आज पुन्हा उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्ला

Updated On:

बुलडाणा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बुलडाणा दौऱ्यावर आहेत. बुलडाण्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज तुमच्या बुडाला तात्पुरतं मंत्रिपद जरूर चिकटलं असेल पण कपाळावरील गद्दार हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही, असे ठाकरे यांनी म्हंटले.

दरम्यान, चिखली येथे संबोधित करताना उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. वीज बिलाचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणीवरून केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओही दाखवला.

उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या या व्हिडिओमध्ये, देवेंद्र फडणवीस मध्यप्रदेश येथील वीज बिल माफीचा संदर्भ देत तत्कालीन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दाखवत ठाकरेंनी उपमुख्यंत्री फडणवीस यांना, ‘जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा’ अशी जोरदार टीका केली.

शिंदे गटावर टीका करताना ठाकरे म्हणाले, आज त्या रक्ताची किंमत तुम्ही विसरलात त्या निष्ठेची तुम्ही माती करुन टाकलीत आणि केवळ आणि केवळ काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही तिकडे गेलात. ठीक आहे आज कदाचित काही मंत्री झाले असतील.. तुमच्या बुडाला आज तात्पुरतं मंत्रिपद जरूर चिकटलं असेल, पण कपाळावरती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला आहे तो आयुष्यामध्ये पुसला जाणार नाही.

गद्दार म्हणून तुमची जी काही ओळख झालेली ती कोणी पुसू शकणार नाही. तो बच्चू कडू म्हणाला, लग्नाला गेलो तरी खोकेवाले आले म्हणतात.. ही ओळख तुमची आता कायमची झालेली आहे. अरे हरणं आणि जिंकणे सोडून द्या निवडणूक आल्यानंतर युद्ध आल्यानंतर जिंकणं विजय होणं किंवा हरणं हे आलंच.. पण जेव्हा माझी जिवाभावाची नाती विसरून तुम्ही केवळ स्वार्थासाठी तिकडे गद्दार म्हणून जाता हे चुकीचे आहे. दरम्यान, ठाकरेंच्या आजच्या भाषणाला शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच त्यांच्या वक्तव्याला मोठा प्रतिसाद मिळत होता.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

2026-10-05 11:24:41

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

2026-10-05 09:19:37

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

2026-10-04 21:24:47

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका