Shivsena MLA Disqualification Result : ठाकरे गटाला मोठा धक्का ! 2018 ला शिवसेना पक्ष घटनेत जो बदल केला तो चुकीचा…

Updated On:

Shivsena MLA Disqualification Result : गेल्या काही महिन्यांपासून अवघ्या राज्यचच नाही तर देशाचं लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्र प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांसह भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबतची लढाई सुरु झाली होती. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यावा असे आदेश दिले होते.

आज (दि.१०) दुपारी 4.30 वाजल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन करण्यास सुरूवात केली.यावेळी अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्यासोबत सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांचे देखील आभार मानले.

निकाल सुनावणीमधील अध्यक्षांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे
घटना नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत,पक्ष ठरवताना हे महत्वाचे घटक असल्याचे यावेळी अध्यक्ष नार्वेकरांनी म्हंटले.
शिवसेनेची २०१८ ची घटना विचारात घेतली.
विधिमंडळातील बहुमत हा मुद्दा देखील विचारात घेतला.
योगेश कदम यांची साक्ष महत्वाची
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या.
२०१८ ला शिवसेना पक्ष घटनेत जो बदल केला तो चुकीचा
उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही.
निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत आहे.
ठाकरे गटाने केलेली घटनादुरुस्ती नियमबाह्य
२०२३ ला निवडणूक आयोगाने पक्षाची जी घटना दिली तीच ग्राह्य धरतो
उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य
२०१८ मध्ये पक्षाची अंतर्गत निवडणूक झालेली नाही मी ती घटनादुरुस्ती नाही.
शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरणार
खरी शिवसेना ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांनाच
२१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले
२०१८ ची शिवसेनेची पद रचना पक्षाच्या घटनेनुसार नव्हती
पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणी सर्वोच्च
पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत.
एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येणार नाही.
पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीला घातक

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

2026-10-05 09:19:37

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी