मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देताहेत. यासाठी आदित्य ठाकरे यांनी विविध ठिकाणच्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वारंवार शिवसैनिकांशी संपर्क साधून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे सांगताहेत. उद्धव ठाकरेंच्या अशाच एका सभेतील एका चिमुकल्या शिवसैनिकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या नव्या शाखेच्या उदघाटनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद देखील साधला. आपल्या भाषणातून ठाकरेंनी यावेळी बंडखोरांसहित भाजपवर देखील निशाणा साधला. याच सभेदरम्यानचा एका व्हिडीओ शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये एक चिमुरडा आपल्या पाल्ल्याच्या खांद्यावर बसून उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद देताना दिसतोय.
शिवसेना… नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे… पिढ्यापिढ्यांचे…! असे कॅप्शन देत सांवंत यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. विशेष म्हणजे यात चिमुरडा खांद्यावर बसून उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टाळ्या वाजवताना तसेच हाताची मूठ घट्ट करून प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतोय. शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जातोय.
शिवसेना… नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे… पिढ्यापिढ्यांचे…!@OfficeofUT @AUThackeray @ShivSena pic.twitter.com/ATolus5o85
— Arvind Sawant (@AGSawant) July 24, 2022
स्क्रीनवर लावलेले उद्धव ठाकरेंचे भाषण पाहणारा हा छोटा शिवसैनिक सध्या चांगलाच व्हायरल होतोय. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांच्या भेटी घेताहेत,