शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांचा समावेश

भोपाल : २९ दिवसानंतर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.  दरम्यान देशात लॉकडाऊन असताना आज पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांचा समावेश आहे. ज्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल लाल जी टंडन यांनी नरोत्तम मिश्रा, कमल पटेल, मीना सिंग, तुळशीराम सिलावट आणि गोविंदसिंग राजपूत यांना मंत्रिपदाची शपत शपथ दिली.

राज्यात काँग्रेसचा राजीनामा देणारे २२ समर्थक आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. तुळशीराम सिलावट आणि गोविंदसिंग राजपूत यांचा सरकार स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका आहे. हे दोघेही आमदार जोतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आहेत. या २२ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे कमलनाथ सरकार पडले होते. या शपथ ग्रहण प्रसांगावेळी भाजपच्या जेष्ठ नेत्या उमा भरती देखील उपस्थित होत्या. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले. आज भोपाळच्या राजभवनात साध्या पद्धतीने शपथविधी पार पडला.

दीड वर्षात पडले कमलनाथ सरकार

कमलानाथ सरकार पडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. कमलनाथ सरकार आणण्यात ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा वाटा होता. त्यावेळी राज्यात अशी चर्चा होती की, सिंधिया आणि भाजप यांच्यात असा करार झाला आहे की, कॉंग्रेस सोडणारे मंत्री आणि आमदार यांनाही भाजपामध्ये समान आदर दिला जाईल.

देशात कोरोनाचे संकट असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजभवनात जाऊन एकट्याने शपथ घेतली होती. त्यानंतर भाजपमधून असे संकेत मिळाले होते कि, १४ एप्रिल लॉकडाऊन समाप्ती नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.