Shivraj Singh Chouhan : पराभवास निवडणूक आयोग नव्हे, काँग्रेसचे नेतृत्वच जबाबदार; शिवराजसिंह चौहान यांची टीका
काँग्रेसच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग नसून काँग्रेसचे विचारशून्य नेतृत्व आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

Shivraj Singh Chouhan : काँग्रेस एकापाठोपाठ निवडणुका सातत्याने हारते आहे. आता आंदोलन करून काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतो आहे. आता काँग्रेस संवैधानिक संस्थांवर हल्ला करत आहे. पण मी काँग्रेसला सांगू इच्छितो की काँग्रेसच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग नसून काँग्रेसचे विचारशून्य नेतृत्व आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.
शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) म्हणाले, काँग्रेसची आज काय अवस्था आहे बघा. उत्तर प्रदेशात त्यांना कुणी विचारत नाही. पंजाबमध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष बदलावा लागला आहे. विविध ठिकाणी त्यांच्या पक्षात नेतृत्वासाठी वाद सुरू आहेत.
कर्नाटकात कधी सिद्धरामय्या, तर कधी डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. तेलंगणातही अवस्था वाईट आहे. मी काँग्रेसमधील नेत्यांना सांगू शकतो की त्यांच्या पराभवाचे कारण इतर काहीही नाही.
काँग्रेस पक्ष लोकांच्या मनातून उतरला आहे. जो पक्ष आता संविधानाच्या गोष्टी करतो आहे त्यांना तो अधिकार नाही कारण त्यांनी ९० हून अधिक सरकारं अशीच बदलली आहेत. पराभवाचं कारण काँग्रेसचं नेतृत्व आहे. देशाची परंपरा, देशाचे लोक याबाबत या नेतृत्वाला काही माहीत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस घटनात्मक संस्थांवर टीका करत आहे आणि आपल्या पराभवासाठी त्यांना दोष देत आहे.
दुसरीकडे पक्षाचे स्वतःचे नेतृत्वच या निवडणूकीतील अपयशाला जबाबदार आहे. केंद्रात सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात काँग्रेस परकीय शक्तींशी हातमिळवणी करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी (Shivraj Singh Chouhan) केला.






