मराठा आरक्षणात लोक अंगावर घेवुन ज्यांना साथ दिली त्यांना काही दिवसात कळेल : शिवेंद्रराजे भोसले

Updated On:
मराठा आरक्षणात लोक अंगावर घेवुन ज्यांना साथ दिली त्यांना काही दिवसात कळेल : शिवेंद्रराजे भोसले

प्रतिनीधी पाचगणी  –  जावली पंचायत समितीच्या निवडणुकीत सायगाव गट ओपन आरक्षण असताना देखील काहींना आता वेगळे मार्ग धरलेले आहेत. पण त्यांना योग्य वेळेला ते पण कळेल की त्यांच्या मागे समाज किती राहीला आणि किती राहीला नाही. हे लोकांना पण दिसेल किंवा ज्यांना ताकद दिली ज्यांना अगदी मराठा आरक्षणामध्ये सगळे लोक अंगावर घेऊन ज्यांच्या मागे ताकदीने उभा राहिलो. त्यांना पण कळेत पुढे काय होणार असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावलीच्या माजी सभापती सुहास गिरी यांना लगावला आहे. ते जावली येथील सर्जापुर येथील एका उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/550503616157469

यावेळी सर्जापुर ग्रामपंचायतीच्या नुतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण कँम्पचे उदघाटन अशा विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमास जावलीचे उपसभापती सैारभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच सौ. स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे यांच्यसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

यावेळी ते म्हणाले गेल्या 12 वर्षापासून जावलीच्या जनेतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही.

विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम रहा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अतुल बोराटे यांनी सुत्रसंचालन केले. नितिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. व किर्तनकार नलावडे यांनी आभार मानले.

आणखी संबंधित बातम्या

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

2026-09-22 19:42:33

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन

2026-09-16 18:04:18

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 'या' संस्थेने परवानगी न देण्याची केली मागणी

2026-09-16 17:42:26

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 'या' संस्थेने परवानगी न देण्याची केली मागणी

Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्‍टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?

2026-09-14 01:15:51

Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्‍टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?

Alephata News: मराठा समाजाचा एल्गार! रास्ता रोकोतून सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

2026-09-12 04:30:04

Alephata News: मराठा समाजाचा एल्गार! रास्ता रोकोतून सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच