शिवेंद्रराजे भोसले उपचारासाठी मुंबईला रवाना
Updated On:

सातारा – सातारा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यासाठी येथून ते मुंबईला रवाना झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
श्री. भोसले यांना काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हार्ट बीटस् वाढल्याने रात्रभर त्यांना रुग्णालयात अंडर आँब्झर्व्हेशन ठेवण्यात आले. आज सकाळी त्यांना मुंबईला नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





