Shivdeep Lande | माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे देखील आज आपलं नशीब आजमावणार आहे. शिवदीप लांडे हे बिहारच्या जमालपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र समोर आलेल्या सुरुवातीच्या कलांनुसार शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत. शिवदीप लांडे यांच्यासमोर इंडियन इनक्लूझिव्ह पार्टीच्या (IIP) नरेंद्र कुमार तांती आणि जेडीयू च्या नचिकेता मंडल यांचे आव्हान आहे. तर जेडीयूचे बंडखोर आणि माजी मंत्री शैलेश कुमार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी सध्या जेडीयू उमेदवार आघाडीवर आहे तर आयआयपीचे उमेदवार नरेंद्र तांती दुसऱ्या नंबरवर आहेत. याशिवाय शिवदीप लांडे आररियामधून देखील पिछाडीवर आहेत. शिवदीप लांडे यांनी निवडणुकीपूर्वी हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. मात्र, ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. दरम्यान, जमालपूर मतदारसंघाचा इतिहास अतिशय रंजक राहिलेला आहे. गेली जवळपास २० वर्षे येथे जदयूची पकड अतिशय भक्कम राहिली आहे. Shivdeep Lande | शिवदीप लांडे कोण आहेत? शिवदीप लांडे यांनी बिहार पोलिसांच्या सेवेत असताना उल्लेखनीय काम केले होते. पोलिस सेवेतून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले मराठमोळे शिवदीप लांडे हे IPS अधिकारी होते. मूळ महाराष्ट्रातील अकोल्याचे शिवदीप लांडे हे २००६ बॅचचे बिहार कॅडरमधील सर्वात लोकप्रिय IPS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. Shivdeep Lande | ते 2009 मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि 2011 पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. यामुळे मुंगेरमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. या भागात त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांनी पटना, अररिया, पूर्णिया आणि मुंगेर येथे कार्यरत असताना गुन्हेगारी, माफिया आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली होती. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांची सिंघम म्हणून ओळख निर्माण झाली आहे. विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. २०१४ साली त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला हेही वाचा: महुआमध्ये मोठा धक्का ! तेजप्रताप यादव पिछाडीवर ; राजपाकडमध्ये जेडीयू आघाडीवर