अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या “सांग तू आहेस का?’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे.
या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, “मला टुव्हीलर शिकताना सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप मदत केली. मालिकेत मी वैभवी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दुचाकीवरचे बरेचसे सीन असल्यामुळे मी दुचाकी चालवायला शिकायचं ठरवलं. सेटवर वेळ मिळाला की माझा सराव सुरु असतो. मला खूप आनंदही होतोय की भूमिकेच्या निमित्ताने मला नवी गोष्ट शिकता आली.
हॉरर आणि रोमान्स असा अनोखा मिलाफ असणाऱ्या “सांग तू आहेस का?’ या मालिकेतल्या शिवानीच्या नव्या लूकचीही चर्चा आहे. रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने, रसिकांच्या शिवानीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.