बाण लागल्याने १२ वर्षीय धनुर्धारी जखमी
Updated On:

नवी दिल्ली : धनुर्विद्येचा सराव करताना चुकून खांद्यातून बाण गेल्याने आसाममधील धनुर्धारी नेमबाजला विमानाने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
एम्समध्ये तिच्यावर गुरूवारी शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. शिवांगिनी गोहेन असे या 12 वर्षीय धनुर्धारीचे नाव आहे.
दिब्रुगढ जिल्ह्यातलि चबुआ येथे ती नेहमीप्रमाने सराव करत होती भारतीय क्रीडा प्राधिकरणात ती प्रीशक्षण घेत आहे. तिच्या उपचाराचा सर्व खर्च क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार आहे. हा बाण तिच्या हाडापर्यंत पोहोचला होता, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. तिची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.





