मुंबई – अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या “टेन्शनवरची मात्रा – महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. यातील अभिनेत्री शिवाली परब आपल्या हास्य अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना हसवत असते. शिवालीचा चाहता वर्ग नेहमीच सोशल मीडियावर तिच्या हास्य अभिनयाचे विडिओ शेअर करत असतात. ती सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशात शिवालीने सोशल मीडिया एका अभिनेत्याबरोबर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. अभिनेता निमिश कुलकर्णीबरोबरचा तिचा हा फोटो आहे. शिवाली व निमिश डेटला गेले होते. याचदरम्यानचा फोटो शिवालीने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला. या फोटोत तिने निमिशचा हात हातात पकडलेला आहे. तर निमिश अगदी गोड हसत आहे. शिवालीने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “माझ्या निब्बाबरोबर डेट. क्युट बेबी”. शिवालीच्या या फोटोची सध्या चर्चा रंगत आहे. शिवालीप्रमाणेच निमिशही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या काही स्किटमध्ये विविध पात्र साकारताना दिसतो. आता सोशलवर चाहते या दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगत आहे.