Shivajirao Adhalrao Patil – आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील निवासस्थानी पुणे म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढळराव पाटील, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, पंचायत समिती सदस्य संजयशेठ पवळे, माजी सरपंच संतोष धुमाळ, उद्योजक वसंतराव पडवळ, अशोकशेठ बाजारे, शामभाऊ गुंजाळ, युवा नेते शैलेश आढळराव पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक रामशेठ तोडकर, संचालक अशोक मामा गव्हाणे, आबा लांडगे, हनुमंत तागड, पतसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी रमेश खरमाळे, सरपंच संगीता शेवाळे, उपसरपंच सचिन ढेरंगे तसेच नारोडीच्या सरपंच मंगलताई हुले यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मंचर नगरपंचायतीच्या नगरसेविका मालती थोरात, उद्योजक रामदास जाधव, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासन अधिकारी शामल चौधरी आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल-श्रीफळ प्रदान करून त्यांचा सत्कार केला. सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांमधील त्यांच्या योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला.