शिवाजीनगर एसटी स्थानक दि.15पासून वाकडेवाडीत

पुणे – शिवाजीनगर एस.टी. स्थानकाचे वाकडेवाडी येथे दि.15 डिसेंबर रोजी स्थलांतर होणार आहे. सध्या शिवाजीनगर येथून काही बसेसद्वारे वाहतूक सुरू आहे. मात्र, लवकरच वाकडेवाडीतून स्थानकातून सर्व एस.टी बसचे संचलन सुरू होणार आहे.
मेट्रोच्या भूमिगत स्थानक कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक स्थलांतरणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर, वाकडेवाडी येथील शासकीय मालकीची डेअरी फार्मची जागा निश्चित करण्यात आली. दिवाळीपूर्वी काही बसेसची वाहतूक वाकडेवाडी स्थानकातून सुरू करण्यात आली होती.
तर, शिवाजीनगर एस.टी. स्थानकातूनही काही बसेसचे संचलन सुरू करण्यात आले. मात्र, वाकडेवाडी स्थानकातील प्लॅटफॉर्मसंदर्भातील काही कामे अद्यापही शिल्लक असल्याने संपूर्ण संचलन केले जात नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वाकडेवाडी स्थानकातून संपूर्ण संचलन केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात स्थानकाची काही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी अवधी असून स्थानकाला शेवटचा हात दिल्यानंतरच ते खुले होणार आहे.





