परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थितीत
कोल्हापूर – कालच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एसटीच्या इलेक्ट्रिक बस उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणं टाळण्याची चर्चा काल सुरू होती. परंतु कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण प्रसंगी मात्र शिवसेना आणि भाजपचे नेते एकत्र पाहायला मिळाले.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एकत्र आले होते. कोल्हापूर उत्तर चे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून हा शिवाजी पुतळा सुशोभिकरणाच्या कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि दिवाकर रावते असल्यामुळे राजकीय शेरेबाजी होईल असं वाटत होतं परंतु या दोघांनीही मोजकेच भाषण केलं. या पुतळा अनावरण सोहळा नंतर त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि साहित्याचे वाटप केले. यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी केंद्र सरकारने वाहनांच्या दंडाच्या वाढवलेल्या रकमे बाबत आपण विधी न्याय खात्याचे मत घेत असून राज्य सरकार ला हा दंड कमी करण्याचा अधिकार आहे का हे जाणून घेत आहे असं सांगितलं. तसंच नागरिकांनी कायदा पाळला तर दंड भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.