Salman Khan’s role in Raja Shivaji : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशी तिहेरी जबाबदारी सांभाळत रितेशने हा चित्रपट साकारला असून मराठी प्रेक्षकांसाठी तो खास ठरत आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांसोबत बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अभिनेता सलमान खानचा कॅमिओ. चित्रपटाच्या प्रिमियरनंतर त्यांची झलक समोर आली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Salman Khan’s role in Raja Shivaji) मोठ्या पडद्यावर सलमान दिसताच प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सलमानच्या भूमिकेबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती. मात्र आता तो ‘जीवा महाला’ ही भूमिका साकारताना दिसत आहे. त्याला या भूमिकेत पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. भगवा कुर्ता, फेटा आणि हातात तलवार असा सलमानचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. एका व्हायरल सीनमध्ये सलमान शत्रूला रोखताना “शिवाजी नाही, ‘शिवाजी राजं’ म्हणायचं!” असा दमदार संवाद म्हणताना दिसतो. या एका डायलॉगवरच थिएटरमध्ये प्रचंड जल्लोष झाल्याचे पाहायला मिळत आहे. Superstar Salman Khan’s powerful cameo in Raja Shivaji 💀❤️🔥 pic.twitter.com/eRylWeHKva — 𝕭𝕺𝕾𝕾⚡ (@Tera_Baap_x9) May 1, 2026 राजा शिवाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आज 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून पहिल्याच दिवशी सुमारे 10 कोटी रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Salman Khan’s role in Raja Shivaji : ‘शिवाजी नाही शिवाजी राजं म्हणायचं’ ; ‘राजा शिवाजी’मधील सलमान खानची दमदार झलक समोर, VIDEO पाहा… या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून, संजय दत्त अफजलखानची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. तसेच इतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. Salman Khan’s role in Raja Shivaji हेही वाचा : Anushka Sharma: रिजेक्शनवर मात करत अनुष्का शर्मा बनली स्टार; ‘रब ने बना दी जोडी’ने बदललं नशीब