pune : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालय व बालक मंदिरात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे शिव वंदना मित्र परिवाराचे अध्यक्ष प्राज भिलारे संस्थेचे अध्यक्ष, प्रशांत मनोरे , सचिव अभिषेक मनोरे, विलास नन्हे, मुख्याध्यापिका डॉ.श्रुती मनोरे तसेच पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जन्मोत्सव सोहळ्यासाठी शाळेत ढोल ताशाच्या गजरात व पुष्पवृष्टीने श्री शिवराय, माँ जिजाऊ व बाल संभाजीराजे यांचे स्वागत करण्यात आले. माही थोरात हिने शिवगर्जना केली. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. विविध घोषणांनी शालेय परिसर दुमदुमला. शिवरायांची तत्वे व अष्टप्रधान मंडळ सादर करण्यात आले .रुद्र आगाशे, वेदांत माने, अभिषेक रणझुंजारे या विद्याथ्यांनी पोवाडा गायन केले. त्यामुळे श्रोता वर्ग भारावून गेला. यानंतर दिव्यांका देसाईने बालशिवबांचा पाळणा सादर केला. विभास देशपांडे याने कराटे तसेच दुर्वेश वाघमोडे याने तलवार, लाठी-काठी प्रात्यक्षिके सादर केली. आदर्श राऊत याने मृदुंग वाजवला, तर रिस्तीका सिंह हिने कथ्थकचे प्रात्यक्षिक सादर केले. pune : श्रीवत्स व शौनक अग्निहोत्री या चिमुकल्यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज व कविकलश यांच्या कवितांची जुगलबंदी सादर केली. तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. यशश्री वरघडे हिच्या हिरकणी या एकपात्री नाटक सादर केले. तसेच इ.१ ली ते ७ वी विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा, शिवकन्या, तुफान या गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. भक्ति मते हिने तयार केलेली शिवबांची कविता सादर केली तर सनम खान हिने आपल्या पत्रातून शिवरायांशी संवाद साधला. पत्राचा विषय होता राजे आज आपण असता तर……तसेच क्रीडास्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धाच्या प्रशस्तीपत्रकाचे वाटप केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचा जीवनपट उलगडला. संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रोत्साहानाबद्दल शिक्षिका व पालकांची त्यांनी प्रशंसा केली.pune : भगवे झेंडे, विद्याथ्यांनी रेखाटलेली शिवकालीन प्रसंगचित्रे, ढाल, तलवार, राजमुद्रा, हातपंखे, शिवरायांची तत्वे व अष्टप्रधान मंडळातील वेशभूषा साकारणारे विद्यार्थी यामुळे विद्यालयाला शिवरायांच्या दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी ‘ घोषणांनी परिसर निनादला. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे स्वागत सूत्रसंचालन व आभार निलम देशपांडे यांनी केले.