नगरच्या बाराही मतदारसंघांत शिवसेनेचे ‘वाघ’ तयार

विधानसभेचे पडघम जोरात वाजू लागले असून भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी शिवसेना भवनात बुधवारी मुलाखती दिल्या. युती होवो न होवो, यावर शिवसेनेने बाराही मतदासंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या

मागील निवडणुकीत नगर जिल्ह्यातील नगर शहर, पारनेर, संगमनेर, अकोले, शिर्डी, श्रीरामपूर हे सहा मतदारसंघ सेनेकडे तर कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव-पाथर्डी व कर्जत-जामखेड हे सहा मतदासंघ भाजपच्या वाट्याला आहेत. सध्या शिवसेनेचे एकमेव आमदार पारनेरमध्ये विजय औटी यांच्या रूपाने आहेत, तर कोपरगाव, नेवासा, राहुरी, शेवगाव -पाथर्डी व कर्जत-जामखेड या पाच मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मात्र, नव्या राजकीय समीकरणात शिर्डीचे कॉंग्रसचे आमदार राधाकृष्ण विखे, अकोले येथून राष्ट्रवादीचे वैभव पिचड हे भाजपमध्ये तर श्रीरामपूरचे कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे शिवसेनेत गेले. श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरुच आहे, तर नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे भाजप की सेना, असे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here