LIVE “आम्ही सुरुवात शिवसेना भवनातून केली, आता शेवट ईडीच्या कार्यालयात करणार”

Updated On:
LIVE “आम्ही सुरुवात शिवसेना भवनातून केली, आता शेवट ईडीच्या कार्यालयात करणार”

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांमुळे त्रस्त झालेलं महाविकास आघाडी सरकार आगामी काळात राज्यातील भाजपला लक्ष्य करणार अशी शक्यता आहे. विशेषत: शिवसेनेने तशी तयारी केल्याचं दिसून येत असून खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच सोमवारी भाजपला गर्भित इशारा दिला होता. त्यानुसार आज पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.

आमचे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री सर्वजण असतील. केंद्रीय तपास यंत्रणांची जी काही दादागिरी सुरू आहे. शिवसेनेवर ज्या पद्धतीने खोट्या आरोपांचा चिखल उडविण्यात येतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल. महाराष्ट्र भाजपमधील साडेतीन लोकांना कारागृहात पाठविण्याची तयारी सुरू केल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं होते.

त्यानुसार पहिला बॉम्ब पडला आहे. ते म्हणाले की, भाजपचे प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्हाला हे सरकार पाडायचं आहे. आमची तयारी झाली आहे. आम्ही सरकार पाडणारच आहोत. तुम्ही मध्ये पडू नका, असंही त्यांनी नेत्यांनी आपल्याला सांगितलं. तसेच तुम्ही मदत केली नाही, तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशी धमकी दिल्याचं राऊत यांनी म्हटलं.

राऊत म्हणाले की, आपण शिवसेनेकडून आतापर्यंत उत्तर दिलं नव्हतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सुचना केली आधी जनतेसमोर जा. त्यामुळे सुरुवात शिवसेना भवनातून केली असून आम्ही अंत ईडीच्या कार्यालयातून करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीत दाखल; मोठी राजकीय घडामोड घडणार?

2026-04-01 22:36:25

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीत दाखल; मोठी राजकीय घडामोड घडणार?

Congress : भाजपला मदत करणे पडले महागात.! काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचे केले निलंबन

2026-04-01 18:14:24

Congress : भाजपला मदत करणे पडले महागात.! काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचे केले निलंबन

Sanjay Raut : जैन मुन्नी आचार्य नयन पद्मसागर यांचं महाराणी ताराराणीबद्दल वादग्रस्त विधान; संजय राऊत कडाडले, फडणवीस, शिंदेंना थेट म्हणाले...

2026-04-01 11:34:02

Sanjay Raut : जैन मुन्नी आचार्य नयन पद्मसागर यांचं महाराणी ताराराणीबद्दल वादग्रस्त विधान; संजय राऊत कडाडले, फडणवीस, शिंदेंना थेट म्हणाले...

Leander Paes : निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का ! लिएंडर पेसचा भाजपात प्रवेश

2026-03-31 15:54:11

Leander Paes : निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का ! लिएंडर पेसचा भाजपात प्रवेश

Akhilesh Yadav : रुपयाप्रमाणेच भाजपची प्रतिमा घसरली.! भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर अखिलेश यांचा टोला

2026-03-31 15:50:01

Akhilesh Yadav : रुपयाप्रमाणेच भाजपची प्रतिमा घसरली.! भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर अखिलेश यांचा टोला