पुणे रेल्वे स्टेशनच्या समस्यांवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
Updated On:

पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांना निवेदन दिलं. स्टेशनवर लाखो प्रवासी येतात, पण रेल्वे प्रशासन सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला.
2023 मध्ये DRM दुबे यांनी 120 सीसीटीव्ही बसवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अद्याप काहीच झालं नाही. शिवसेनेने 24 तास सुरक्षा, सीसीटीव्ही, महिला सुरक्षितता, बसण्याची सोय, स्टॉलवर बंदी, पार्सलसाठी जागा आणि दारूबंदीसह 11 मागण्या केल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शहरप्रमुख संजय मोरे, उत्तम भुजबळ, अनिल दामजी, रोहिणी कोल्हाळ, गिरीश गायकवाड आदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासन काय पावलं उचलतं, याकडे लक्ष लागलं आहे.





