Koynanagar: शिवसेना-युवा सेनेचा दिवाळी फराळ उपक्रम उत्साहात; ना. शंभूराज देसाई यांची प्रेरणा
Koynanagar माजी सरपंच शैलेंद्र शेलार आणि युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय देसाई यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सण-उत्सवांच्या माध्यमातून नागरीक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना एकत्र आणणे, परस्परांमधील जिव्हाळा वाढविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

Koynanagar: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि माणसामाणसांतील स्नेहबंध अधिक दृढ करणारा सण! याच आनंदोत्सवाला सामाजिक एकतेची जोड देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रेरणेतून शिवसेना व युवा सेनेच्या वतीने कोयनावासियांसाठी आयोजित करण्यात आलेला दिवाळी फराळ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
माजी सरपंच शैलेंद्र शेलार आणि युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय देसाई यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सण-उत्सवांच्या माध्यमातून नागरीक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना एकत्र आणणे, परस्परांमधील जिव्हाळा वाढविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. दिवाळी फराळाच्या निमित्ताने कोयनानगर परिसरात स्नेह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. फराळाचा आस्वाद घेत उपस्थितांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील, पंचायत समिती सदस्य मंगल माने, विभागप्रमुख महादेव येडगे, राजेंद्र लाड यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदापेक्षा माणुसकी आणि राजकारणापेक्षा आपुलकीला महत्त्व देणारा हा स्नेहमेळावा कोयनावासियांसाठी दिवाळीची खास मेजवानी ठरला.





