शिवसेनेत फुट अन् छगन भुजबळांचे बंड; 33 वर्षांपूर्वी नागपुरात शपथविधी सोहळ्यात नेमकं काय घडलं?

Cabinet Expansion | राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (15 डिसेंबर) रविवारी पार पडणार आहे. नागपूर येथील राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. मात्र अद्यापही संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाचा हा मंत्रिमंडळ विस्तार फारच खास असणार आहे. यापूर्वी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. त्यानंतर तब्बल 33 वर्षानंतर नागपुरात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे शनिवारी रात्री नागपूर येथे आगमन झाले. Cabinet Expansion |
नागपुरात होणारा हा दुसरा शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरात होणारा हा दुसरा शपथविधी आहे. 21 डिसेंबर 1991 मध्ये उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. तेव्हा छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. Cabinet Expansion |
छगन भुजबळ यांचा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश
या शपथविधी सोहळ्याच्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ त्यांच्या 11 सहकारी आमदारांसह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते. तेव्हा भुजबळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी चर्चा होती. 20 डिसेंबरच्या दुपारी सुधाकरराव नाईक यांनी तत्कालीन राज्यपाल श्री सुब्रमण्यम यांना नव्या मंत्र्यांची यादी मुंबईत सोपवली होती. Cabinet Expansion |
एक कॅबिनेट मंत्री आणि सहा उपमंत्री यांना दिली होती शपथ
त्यानंतर 21 डिसेंबरला तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम हे तातडीने मुंबईवरून नागपूरला आले होते. संध्याकाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर साडेचार वाजता नागपूरातील राजभवनात एक कॅबिनेट मंत्री आणि सहा उपमंत्री यांना शपथ दिली देण्यात आली होती.
मंत्रीपदासाठी कोणाची नावे चर्चेत ?
भाजपकडून गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. संजय कुटे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल सावे, जयकुमार रावल. तर योगेश सागर, शिवेंद्रराजे भोसले, राणा जगजित सिंह, समीर कुणावार आणि नितेश राणे अशा नव्या चेहर्यांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे.
शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, भरत गोगावले, भावना गवळी, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





