Shivsena News : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ! 2 नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक पातळीवर नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या (Shivsena News) घटना वाढल्या आहेत.

Shivsena News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक पातळीवर नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या (Shivsena News) घटना वाढल्या आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांनंतरही अनेक नेते आपल्या सोयीप्रमाणे पक्ष बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) चे दोन प्रमुख स्थानिक नेते (Shivsena News) अनिल शिंदे आणि बाळासाहेब समुद्रे यांनी पक्ष सोडून स्वराज्य शक्ती सेनामध्ये प्रवेश केला आहे. अनिल शिंदे हे नाभिक सेनेचे खजिनदार आहेत, तर बाळासाहेब समुद्रे हे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष आहेत. दोघांचा पक्षप्रवेश स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
करुणा मुंडेंची प्रतिक्रिया
पक्षप्रवेशानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शिवसेना शिंदे गटात या दोघांना न्याय मिळत नव्हता. त्यांना आपल्या नेत्याला भेटता येत नव्हते. त्यामुळे संतप्त होऊन ते आमच्या पक्षात सामील झाले आहेत.”
स्वराज्य शक्ती सेना पक्षाची पार्श्वभूमी
करुणा मुंडे यांचा स्वराज्य शक्ती सेना पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे १२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आली होती. पक्षाचे मुख्य कार्यालय मुंबईतील सांताक्रुझ येथे आहे, तर बीड जिल्ह्यातही एक कार्यालय कार्यरत आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत करुणा मुंडे यांनी परळी आणि बीड या दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परळी मतदारसंघातील अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना फारच कमी मते मिळाली होती.
धाराशिव जिल्ह्यातील दोन प्रभावशाली स्थानिक नेत्यांच्या प्रवेशामुळे (Shivsena News) स्वराज्य शक्ती सेना पक्षाला जिल्ह्यात विस्तार करण्याची संधी मिळाली आहे. स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो. भविष्यात या पक्षाची जिल्हा व राज्यस्तरावरील भूमिका काय राहील, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.






