Raigad News | मागील चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे दरड कोसळल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. शेकापचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात हा वाद झाला. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या समोर शेकापचे नेते आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांनी ५० खोकेचे विधान केले. पन्नास खोके सरकार करतोय काय सत्ता तुमच्याकडे असताना हे सरकार करतंय काय? आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही. ‘या घटनेत जो दोषी आहे त्याच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे. किती दिवस हा चिखलाचा रस्ता आम्ही सहन करणार? आमच्या जीवनाची काही किंमत आहे की नाही. हे ५० खोके कोण काय? घाणेरडं चाललं आहे हे राजकारण आणि समाजकारण’, असे म्हणत चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक आमदारावर निशाणा साधला. दोन्ही महिला नेत्या आमने-सामने यावेळी, त्यांच्या पाठिमागेच उभ्या असलेल्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी चिडल्या आणि त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांना पाठीमागून धक्का दिला. त्यानंतर, या दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्येही धक्काबुक्की झाली. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. यावेळी दोन्ही महिला नेत्या आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. Raigad News | दरम्यान, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड करुन गुवाहटी गाठल्यानंतर सत्तेत सामील झाले. त्यानंतर शिंदे गटावर गद्दार आणि ’50 खोक्के एकदम ओक्के’ अशी टीका करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने चित्रलेखा पाटील यांनी नाव न घेता 50 खोके म्हटल्याने आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी संतापल्याचे दिसले. Raigad News | हेही वाचा: BEST Election Result : बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय घडलं?