Shiv Sena MLA Disqualification Case Live : शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाहीच, निकालाचं वाचन सुरू…

Updated On:

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दीड वर्षापूर्वी दोन गटात विभागलेल्या शिवसेनेत सुरू झालेली कायदेशीर लढाई आता संपुष्टात येईल असं दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. कोण अपात्र आणि कोण पात्र (ठाकरे की शिंदे)ठरणार? याबाबतच्या निकालाचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून वाचन सुरु झालं आहे.

या निकालवाचनात विधानसभा अध्यक्ष यांनी निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. असं स्पष्ट केलं आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे आहे. निवडणूक आयोगाचा निकाल, पक्षाची घटना याचा आधार निकाल देताना केला आहे. 2018 मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना 1999 सालची ग्राह्य धरणार आहे.”, असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे.

शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही…

या निर्णयाचे वाचन करताना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. ते शिंदे यांना हटवू शकत नाही. शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव यांना नाही, असे अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, शिंदे यांना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यांना ती व्यक्ती आवडत नाही म्हणून ते एखाद्याला काढून टाकू शकत नाही. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते. शिंदे यांना हटवायचे असेल तर तो कार्यकारिणीचा निर्णय असायला हवा होता, असं अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन