Shiv Sena MLA Disqualification Case Live : शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र नाहीत, ठाकरेंना आणखी एक धक्का…

Updated On:

मुंबई – महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्धव ठाकरे  गटाने केलेली मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली आहे. शिंदे गटाचा एकही आमदार अपात्र नसल्याची घोषणा सभापतींनी केली. शिंदेंचे 16 आमदार पात्र ठरले आहेत.  या निकालाची घोषणा करताना अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शिंदे गटाची शिवसेना खरी आहे. निवडणूक आयोगानेही हीच खरी शिवसेना मानली आहे. याची दखल या निर्णयात घेण्यात आली आहे.

तत्पूर्वी, निर्णय वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शिंदे यांना नेतेपदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. तसे करायचे असेल तर हा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घ्यायला हवा होता. निकाल देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, ECI ने शिंदे गटाची शिवसेना खरी मानली आहे. हे मी निर्णयात लक्षात ठेवले आहे.

बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.  शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत, बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही, असं निरिक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांवर निकाल दिला आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, तानाजी सावंत, लता सोनवणे, प्रकाश सार्वे, बालाजी किणीकर, संदिपान भुमरे, बालाजी कल्याणकर, रमेश बोनारे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर यांचा समावेश आहे.

16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदें यांचीच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, या निकालवाचनात विधानसभा अध्यक्ष यांनी निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. असं स्पष्ट केलं आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे आहे. निवडणूक आयोगाचा निकाल, पक्षाची घटना याचा आधार निकाल देताना केला आहे. 2018 मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना 1999 सालची ग्राह्य धरणार आहे.”, असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे.

या निर्णयाचे वाचन करताना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. ते शिंदे यांना हटवू शकत नाही. शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव यांना नाही, असे अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, शिंदे यांना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यांना ती व्यक्ती आवडत नाही म्हणून ते एखाद्याला काढून टाकू शकत नाही. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते. शिंदे यांना हटवायचे असेल तर तो कार्यकारिणीचा निर्णय असायला हवा होता, असं अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन