बारामती : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना देखील रिंगणात उतरली आहे. जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवढे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असून त्यांनी पाच प्रभागात सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. बारामती नगर परिषदेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनेक वर्ष वर्चस्व आहे. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांचे मित्र असलेल्या पक्षांनी उमेद देऊन रंगत भरली आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्ष, शिंदे शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. असे असले तरी अर्ध माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेने धनुष्यबाणाचे चिन्हावर आपली उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. बारामती नगर परिषदेसाठी २० प्रभागात ४१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शिंदे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे हे सचिन सातव यांच्या विरोधात रिंगणात आहेत. तसेच प्रभाग २,७,१३,१५,१६, मध्ये त्यांनी सात उमेदवार दिले आहेत. भाजप व इतर मित्र पक्षाशी युती न करता जेवरे यांनी धनुष्यबाणावर निवडणूक लढल्याचा निर्णय घेतला. सर्व प्रभागात त्यांनी उमेदवार दिले नसले तरी देखील. काही प्रभागात त्यांनी दिलेले उमेदवारांची चर्चा आहे.