Satara | भगवा सप्ताहानिमित्त लोणंदमध्ये शिवसेना शाखेचे उद्धघाटन

लोणंद, (प्रतिनिधी) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंडाळा तालुका व लोणंद शहर यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहनाला प्रतिसाद देत केलेल्या भगवा सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
याप्रसंगी लोणंद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शिवसेना सप्ताहानिमित्त शिवसेना सभासद नोंदणी व शाखेचे उद्घाटन करण्यात आले भगवा सप्ताहानिमित्त यामध्ये प्रामुख्याने शिवसेना सदस्य नोंदणी घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शाखा नवीन मतदारांची नोंदणी तसेच बुथप्रमुख, गटप्रमुख बीएलए पदाधिकारी यांच्या नेमणुका कार्यक्रमांतर्गत करण्यात आल्या.
यावेळी संपर्कप्रमुख वाई खंडाळा अविनाश सावंत, महाबळेश्वर संपर्कप्रमुख, अमित देशमुख, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराव जगताप, वाई विधानसभा संपर्क संघटिका वर्षा जाधव, जिल्हा संघटक रामदास कांबळे,
वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजितराव यादव, लोणंद शहर प्रमुख तथा महाराष्ट्र वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख सुनील यादव, महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका अध्यक्ष तथा लोणंद उपशहर प्रमुख हेमंत पवार,
वाहतूक सेना जिल्हा सल्लागार जगन्नाथ येळे ,वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष योगेश शेळके, लोणंद शहराध्यक्ष नानासाहेब धायगुडे, फलटण प. तालुकाप्रमुख विकास नाळे, माजी विभाग प्रमुख दत्ताआबा ठोंबरे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, लोणंद शहर संघटक हनुमंत ठोंबरे, उपशहर प्रमुख अविनाश नलवडे, सर्व आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक व महाराष्ट्र वाहतूक सेना संघ सभासद उपस्थित होते.





