satara | कोरेगावात शिवसेना-भाजपकडून नाना पटोले यांचा निषेध

कोरेगाव, (प्रतिनिधी) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने पाय धुतले. या प्रकरणावरून कोरेगावमध्ये शिवसेना व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला.
नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताच भाजप आणि शिवसेनेने नाना पटोले यांना टार्गेट केले आहे. शिवाय कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, भाजप कायदा आघाडीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट अमोल भुतकर, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे,
सचिन बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, राजेंद्र वैराट, अर्जुन आवटे, दीपक फाळके, अजित विलासराव बर्गे, फरदीन मुजावर, संतोष शिवाजीराव बर्गे यांच्यासह महिला नगरसेविका संजीवनी बर्गे, स्नेहल आवटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उज्वला बर्गे, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांचा निषेध करण्यात आला. एडवोकेट अमोल भुतकर यांनी आंदोलनामागील भूमिका व्यक्त केली.





