कोल्हापुरात भाजपच्या विरोधात शिवसेना आक्रमक !
Updated On:

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज शिवसेनेने कोल्हापुरात जोरदार निदर्शने केली आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
तसेच यावेळी भाजपा च्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान शिवसेना कदापि सहन करणार नाही. अवमान करणाऱ्याच्या विरोधात तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे





