satara | शिवराज्याभिषेक दिन पाचगणीमध्ये उत्साहात

भिलार, (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्ष पूर्ण होण्याचे औचित्य साधून काल दि. ६ जून रोजी पाचगणीत फटाक्याच्या आतषबाजीत शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक व पुष्पवृष्टी करून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला. पाचगणी नगरपालिकेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ध्वजारोहण केले.
या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांचे पोवाडे म्हणण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पवार, नारायण बिरामणे, प्रवीण बोधे, हरीश गोळे, प्रकाश गोळे, सूर्यकांत कासुर्डे, महेश खडके, सतीश दुधाने, आबासाहेब पाटील, गणेश राजपुरे तसेच अन्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नानासाहेब कासुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराय की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला गेला, पोवाडयांमुळे पाचगणी परिसर शिवमय झाला होता, याच दरम्यान परिसरातील ग्रामपंचायतींसमोर सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.





