तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, संगणक विभाग प्रमुख सोनाली सासवडे, शहर समन्वक गीतांजली होनमाने, आस्थापना लिपिक भास्कर वाघमारे, रोहित भोसले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, विलास वाघमारे, आदेश गरुड, प्रवीण शिंदे, विशाल लोणारे, बाळासाहेब पवळे कर्मचारी सनी ननावरे, अभिजित हटवाल, महादेव गायकवाड, मंगेश मोईकर, राहुल आगळे, प्रकाश मकवाना, अंकुश जाधव, आकाश बीडलान, नाईक अनिल इंगळे, चंद्रशेखर खंते, भिवा पिचड, शिक्षण मंडळ लिपिक बाळू जढर, मयुरेश मुळे उपस्थित होते. यावेळी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायले. ‘अफझल खानाचा वध’ ह्या पोवाड्याचे गायन प्रगती भास्कर वाघमारे या विद्यार्थिनीने केले. सिद्धेश्वर महाजन, समन्वयक गीतांजली होनमाने यांनी महाराजांच्या अतुल्य कार्याचा गौरव केला. तर मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी आपण सर्व नागरिकांना योग्य प्रकारे तत्पर सेवा दिल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्याचे सार्थक होईल. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन केले.