शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर शुक्रवार दि. ०२ ऑगष्ट रोजी शिरूर येथे सकाळी ११.०० वा. घेण्यात येणार असल्याची माहीती शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे. दिव्यांगासाठी आरोग्य विभाग, आधार कार्ड काढणे,सेतु मधील सर्व प्रकारचे दाखले, मतदार नोंदणी, संजय गांधी योजनेचा लाभ, पंचायत समितीमार्फत ५ % अंपग निधी, समाजकल्याणमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना इ. या शिबिरामध्ये गरजूंना लाभ देण्यात येणार असल्याचे अव्वल कारकून निलेश खोडसकर यांनी सांगितले आहे. दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर हे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरुर येथील तिसरा मजला येथे होणार आहे. या दिवशी शिरूर तालुक्यातील दिव्यांगासाठी असलेल्या योजनेचे लाभ दिव्यांगाना देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना सर्व माहितीसह उपस्थित राहणार असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिरूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.