Shirur News : गेली अनेक वर्षे बिबट्याच्या समस्येने (Shirur News) शिरूर, आंबेगाव, जुन्नरसह खेड तालुक्याला मोठ्या प्रमाणात ग्रासले असून मागील दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हजारोच्या संख्येत पशुधन धोक्यात आले. या धर्तीवर मंगळवारी पिंपरखेड (ता.शिरूर) येथे (Shirur News) वनविभागाकडून मानव- वन्यप्राणी संघर्ष या विषयावर उपाययोजनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली. Shirur News या कार्यक्रमासाठी जुन्नरच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस , शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून या कार्यशाळा कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आले. या कार्यशाळेच्या (Shirur News) माध्यमातून मानव- वन्यप्राणी संघर्ष आणि त्याची कारणे, त्यासंबंधीच्या उपाययोजना,घ्यावयाची काळजी या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता श्रीदत्त मंदिर सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.