Shirur News : कळसकरवाडी येथे भीषण अपघात ! शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर : शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीतील कळसकरवाडी येथे १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता झालेल्या भीषण अपघातात शेतकरी दिलीप दगडू शिंदे (वय ५०, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सतीश दिलीप शिंदे (वय ३८, रा. इनामगाव) यांच्या तक्रारीनुसार, दिलीप शिंदे हे त्यांच्या बजाज सी.टी. ११० एक्स मोटारसायकलवर (MH12TP4081) जात असताना, आरोपी महेश शिवाजी तावले (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवलेल्या महिंद्रा चारचाकी वाहनाने (MH14GA8624) त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात दिलीप शिंदे गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले.यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, तपास पोलीस हवालदार गवळी करत आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.





