शिरूर: साबळेवाडीत शासकीय मालमत्तेचे नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवला गेला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी आरोपी भागा हरी भाईक आणि विश्वनाथ भागा भाईक (दोघेही रा. साबळेवाडी, ता. शिरूर) यांनी संगनमताने शासकीय खर्चातून उभारलेले तारांचे कंपाऊंड आणि चर तोडून नष्ट केले. या तोडफोडीमुळे सुमारे २४,६०० रुपये किमतीचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर करत असून, पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शासकीय मालमत्तेच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.





