शिरूर- शहरात ४ तर तालुक्यात १० असे शिरूर तालुक्यातील दहा गावात एकूण चौदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यात कोरोनाची आकडेवारी रोजच वाढत असून कमी होण्याचे नाव घेत नाही यामुळे शिरूर तालुक्यातील प्रशासन चिंतेत असून यासाठी नक्की काय उपाययोजना करायची याबाबत संभ्रमात आहे.
आज शिरूर शहरातील कोविड केअर सेंटर येथून कोरोना तपासणी करता शिरूर शहरातील 13 तर शिरूर तालुक्यातील 32 असे एकूण 45 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत.
शिरूर शहरातील श्री हाईटस येथील 62 वर्षीय व्यापारी 60 वर्षीय व्यापारी या दोघांना तर भाजीबाजार येथील एका 38 वर्षीय तरुणाला, साई नगर येथील एका 24 वर्ष गर्भवती महिला असे एकूण चार जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे शिरूर शहरातील कोरणा रुग्णांची संख्या आता रोजच वाढत आहे.
शिरूर तालुक्यातील कोरोना चा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसून आज नव्यानं शिरूर तालुक्यातील शिरूर शहर ४,वाजेवाडी १, पाबळ १, सोनेसांगवी १, शिक्रापूर १, शिरूर ग्रामीण २, रांजणगाव गणपती १, सादलगाव १, पिंपरखेड १, तळेगाव ढमढेरे १ असे एकूण दहा गावात 14 कोरूना बाधित रुग्ण सापडले आहे.
शिरूर तालुक्यातील सादलगाव, पिंपरखेड या गावात नव्याने रुग्ण सापडल्याने शिरूर तालुक्यातील इतर गावेही आता कोरोना बाधित होतात का याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले होम क्वारटाइन केलेले अनेक जण हातावर शिक्का मारलेले शाही पुसून गावांमध्ये फिरत आहेत यासाठी प्रशासनाने अशा नागरिकांवर लक्ष देऊन त्यांना एकाजागी थांबण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे.