न्हावरे व शिक्रापूर (प्रतिनिधी) : न्हावरे (ता. शिरूर) येथे तीन नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पिडीत महिला शौचास गेली असताना महिलेची छेडछाड करून महिलेला मारहाण करून महिलेचे दोन्ही डोळे निकामे केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असताना महिलेची छेडछाड करून तिचे डोळे निकामे करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1389688751370826/
कुंडलिक साहेबराव बगाटे (रा. उंडवडे,सुपे, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असल्याचे माहिती समोर येत आहे. न्हावरा (ता. शिरूर) येथे तीन सप्टेंबर रोजी न्हावरा येथील महिला सायंकाळ च्या सुमारास शौचास गेली असताना अचानक त्या ठिकाणी एक इसम आला आणि त्याने महिलेवर हल्ला करून महिलेला मारहाण करून महिलेच्या डोळ्यावर कशाने तरी प्रहार करून महिलेचे दोन्ही डोळे निकम केले होते.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असताना याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांसह आदींना या गुन्ह्यातील तपासाबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार तपास करून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.