शिरूर : शिरूर तालुक्यातील 9 गावात 11 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. तर शिरूर तालुक्यात रोजच कोरोना बाधितांचे मध्ये नवीन गावांचा समावेश होत असून ही शिरूर तालुक्याच्या दृष्टीने चिंता करण्याची बाब आहे.
शिरूर शहरातील यशवंत कॉलनी येथील 10 वर्षे वयाचा मुलगा व त्याच्या घरातील 52 वर्षीय पुरुष असे दोघे घरातील कोरोना बाधित यांच्या संपर्कात आल्याने तर काची आळी येथील 29 वर्षीय कंपनी कामगार असे मिळून तिघेजण शिरूर शहरात कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे शिरुर शहराची कोरोनाबाधितांची संख्या 81 एवढी झाली असून, आजपर्यंत शहरातून 25 जणांना उपचार करुन सोडण्यात आले. तर बाबुराव नगर येथील 32 वर्षीय कंपनी कामगार कोरोनाबाधित आहे.
शिरूर तालुक्यातील प्रशासना याबाबत ठोस कारवाई करत आहे परंतु औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा पादुर्भाव होत आहे याकडे मात्र सगळ्यांचे दुर्लक्ष आहे.
शिरूर तालुक्यातील शिरूर शहर 3, कारेगाव 1, सोनेसांगवी 1, शिरूर ग्रामीण 1, वरुडे 1, रांजणगाव गणपती 1, शिक्रापूर 1, कासारी 1, विठ्ठल वाडी 1, असे एकूण नऊ गावात 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.
शिरूर तालुक्यात रोजच रुग्णांची वाढ होत असेल यासाठी प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. तर अनेक गावांमध्ये क्वारंटाईन केलेले अनेक नागरिक फिरताना दिसत आहे याचा ही तोटा तालुक्याला होत आहे. क्वारंटाईन नागरिकांना शासकीय जागेमध्ये ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक भागात असे नागरिक इकडे फिरताना दिसत आहे त्याचा तोटा तालुक्याला होत आहे. शिरूर शहरातील कोरोना बाधित यांचा आकड कमी होताना दिसत नाही.
एकीकडे कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. परंतु, नागरिक, व्यापारी यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे ते हे तुमच्या आणि नागरिकांच्या सर्वांच्याच भल्याचे असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.