Devendra Fadnavis : शिर्डी हे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ आता देशाच्या संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणूनही उदयास येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी MIDC परिसरात तब्बल २०० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Devendra Fadnavis) ‘आत्मनिर्भर भारत’चा मोठा टप्पा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis) फडणवीस म्हणाले की, ग्रामीण भागातील युवक गणेश निबे यांनी उभारलेला हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या आत्मविश्वास आणि तांत्रिक क्षमतेमुळे देशासाठी महत्त्वपूर्ण संरक्षण साहित्य आता महाराष्ट्रात तयार होणार आहे. (Devendra Fadnavis) ३६५ दिवस पुरेल इतका दारूगोळा उत्पादनाचा दावा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पात वर्षभर अखंडपणे उत्पादन सुरू राहील. येथे तयार होणारे तोफगोळे, अत्याधुनिक ड्रोन आणि १५० ते ३०० किलोमीटर अंतरावर अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. (Devendra Fadnavis) त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धजन्य परिस्थितीत सलग ३६० ते ३६५ दिवस दारूगोळा पुरवठा करण्याची क्षमता या एकाच प्रकल्पात विकसित करण्यात आली आहे. ड्रोन आणि मिसाईल तंत्रज्ञानावर भर या प्रकल्पात शत्रूवर अचूक लक्ष्य साधणारे गाईडेड ड्रोन आणि आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यात येत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत फडणवीस यांनी सांगितले की, भारताने आत्मनिर्भर संरक्षण व्यवस्थेची ताकद प्रत्यक्ष दाखवून दिली आहे. (Devendra Fadnavis) अहिल्यानगर डिफेन्स हब बनणार मुख्यमंत्री म्हणाले की, आता अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनत आहे. याशिवाय नाशिक, पुणे आणि नागपूर येथेही ‘डिफेन्स कॉरिडॉर’ उभारण्याची तयारी सुरू असून संरक्षण मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. (Devendra Fadnavis) ‘वंदे भारत’ने शिर्डी प्रवास या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून शिर्डीपर्यंतचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस ने केला. कोणताही खासगी विमान, हेलिकॉप्टर किंवा मोठा ताफा न वापरता त्यांनी रेल्वे प्रवास केल्याने त्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. (Devendra Fadnavis)