मुंबई – वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची ! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदु तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खुश केले आहे.
वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरात कडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 14, 2022
वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरात कडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे. असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारने लाखो हिंदू तरुणांना बेरोजगार केला असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.
वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची ! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरात मध्ये शिंदे सरकारने घालवला . लाखो हिंदु तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खुश केले आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 14, 2022
दरम्यान, पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गुजरात सरकारने वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीशी करार केला असून त्याद्वारे गुजरात राज्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.